सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी ७२ वर्षीय अर्जुन रामगिर यांनी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत प्रवास केला. त्यांच्या या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. अर्जुन रामगिर यांची ठाण्यात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच तातडीने त्यावर लक्ष दिलं जाईल, असं आश्वस्त देखील केलं.