1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता. यामध्ये काही महत्वाच्या योजना आणि घोषणा करण्यात आल्या. मात्र महाराष्ट्रात शिंदे गटासोबत भाजपाला साथ दिलेल्या प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी देशाचा अर्थसंकल्प हिंदी भाषेत सादर न करता अंग्रेज कम बॅक पध्दतीने इंग्रजीत सादर केल्याने टिका केली आहे.
#BacchuKadu #Budget2023 #EknathShinde #NarendraModi #BJP #Maharashtra #ShivSena #DevendraFadnavis #Amravati #NirmalaSitharaman #PraharJanshakti #HWNews