जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आव्हाडांचे समर्थन केले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समर्थकांवर देखील कारवाई करू असा इशारा दिला, यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या भूमिकेवर निशाणा साधला.