नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील नाना फरारीचा पाडा म्हणून प्रसिद्ध असलेला आदिवासी पाडा म्हणजे डोंगरपाडा. याला आता सोमनाथ नगर म्हणून देखील ओळले जाते. या पाड्याची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. या पाड्यावरील अडीच फुट उंची असलेल्या मोहन बेंडकुळे या युवकाने पाड्यावर पिण्याचे पाणी यावे यासाठी तब्बल वीस वर्ष लढा दिला. अखेर त्याच्या लढ्याला यश आले असून तब्बल 80 लाखाची योजना मंजूर करून घेतली आहे.