अवैध बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षा संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजपासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. तसेच रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.