पुण्यात स्वराज्य संघटनेनंतर काँग्रेस, राष्ट्रवादीही राज्यपालांविरोधात आक्रमक झालेत.राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांविरोधात आंदोलन केलं.राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटलांसह कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर आहेत.काळे झेंडे दाखवण्याचा इशारा आधीच राष्ट्रवादीनं दिला होता.राष्ट्रवादीनंतर राजभवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.स्वराज्य संघटना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या.