विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-ठाकरे गटात जुंपल्याचं दिसलं. यावेळी विषय समृद्धी महामार्गाचा होता पण आदित्य ठाकरेंनी आधी मंत्री शंभुराज देसाईंना काळजीवाहू मंत्री म्हणत डिवचलं. त्यानंतर मुंबई-सूरत महामार्गाच्या दर्जाचं उदाहरण देत सरकारला सूचना केली. यावरुन शंभुराज देसाईंनीही शिल्लक सेना उल्लेख करत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आणि समृद्धी महामार्गाचं प्रकरण थेट मुंबई-सूरत महामार्गावरुन गुवाहाटीपर्यंत गेल्याचं दिसलं. शेवटी आदित्य ठाकरेंच्या मदतीला विरोधी पक्षनेते अजित पवार तर तिकडे, शंभुराज देसाईंच्या बचावाला गुलाबराव पाटील आले अन् सभागृहात काही काळ ठाकरे विरुद्ध शिंदे वाद तापलेला दिसला.