महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.यावेळी महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर बोलताना जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना बोलण्याची विनंती केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी जास्त लोकांनी बोलू नये असं म्हंटल. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर भडकलेले पाहायला मिळाले.