आज राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायतीतील विजयानंतर शिंदे-फडणवीसांचा आनंद गगनात मावेना झाला. आज अधिवेशनचा दुसरा दिवस संपल्यानंतर फडणवीस- शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. त्यावेळी विजयाच्या आनंदात पेढा भरवतानाचे गंमतीचा प्रसंग घडला.