सकाळी ६ वाजल्यापासून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरच्या कागलमधील घरी ईडीनं धाड टाकली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी कागलमधील घराबाहेर गर्दी केली. तर तिकडे शस्त्रधारी पोलीसही तैनात करण्यात आले. त्यामुळे मुश्रीफांच्या घराबाहेर आणि परिसराला पोलीस छावणीचं रूप आलंय.