मविआच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा, मला अटक व्हावी, असा प्रयत्न तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मार्फत झाला, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते.