शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुंबईत काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन शक्तीमान हिंदू नेत्यांचं देशात राज्य आहे. महाराष्ट्रात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरी देखील राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला.
#UddhavThackeray #SanjayRaut #Shivsena #AjitPawar #LoveJihad #Morcha #NitinGadkari #ShahajiBapuPatil #BJP #BageshwarBaba #RohitPawar #Maharashtra