कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीसाठी आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर प्रतिक्रिया देत पक्षाचे आभार मानले आहेत.