कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून हेमंत रासने कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून अर्ज दाखल करण्यास मार्गस्थ झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार माधुरी मिसाळ,माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर, धीरज घाटे,गिरीश बापट यांच्या सुन स्वरदा बापट हे उपस्थित होते. तर यावेळी या सर्वांनी एकाच चार चाकी वाहनातून प्रवास केला पण या वाहनातील क्षमतेपेक्षा जास्त लोक झाल्याने बसण्यास अडचण येऊ लागली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वाहनामध्ये जागा नसल्याने थेट धीरज घाटे यांच्या मांडीवर बसून प्रवास केला.