शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे सध्या औरंगाबादमध्ये असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महालगावमधील प्रकारावर भाष्य केलं. 'आमची सभा नीट झाली. काही लोकांना वातावरण बिघडवायचं असेलही. पण या शिवसंवाद यात्रेदरम्यान शेतकरी बांधवांसोबत संवाद होत आहे', असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.