कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. गेल्या आठवड्यात ईडीने कोल्हापूर जिल्हा बँकेवर धाड टाकली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून या प्रकरणी सतत गंभीर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी हे निव्वळ माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा त्यांनी दिला आहे.