शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे नाशिक येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली. शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालू आहे. पण ही वाघाची फौज आहे, असं म्हणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं आहे.