महाराष्ट्राचे राजकारण पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या प्रकणाची राज्यभरात चर्चा होत आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया विचारले असता, पवार म्हणाले की, "मी पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलणार नाही. मी तीन वर्षांपूर्वीच सांगितलं होतं, पहाटेच्या शपथविधीवर मला बोलायचे नाही, तुम्ही मला पुन्हा पुन्हा याबाबत का विचारता?