माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं आहे. त्यांनी आता स्वतःच्या वडिलांच्या नावे शिवसेना चालवून
दाखवावी, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तर ज्यांना आपलं समजलं त्यांचे खरे चेहरे कळले, असं म्हणत
ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर देखील निशाणा साधला.