मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. राजकीय वर्तुळातून या घटनेवर निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. कोणालाही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील, असं शेलार म्हणाले.