गुढीपाडवाच्या मनसेच्या सभेनंतर आलेल्या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्हाला पाठीत खंजीर खुपसायची सवय झालेली आहे. तुम्ही अगोदर राणे यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुद्धा पाटीत खंजीर खुपसला. तसेच भाजपाच्यासुद्धा पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांनी मतदारांनी निवडून दिले आहे, त्यांच्यासुद्धा पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे' अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे