काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. अशोक खरात हा स्वतःच्या बुद्धीने हल्ला करेल असं वाटत नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच अशोक खरात याने हल्ल्याची कबुली दिली तरी या संदर्भात आपल्याला पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.