महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आज विधानसभेत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, 'राज्यसरकार या सीमावादाच्या बाबतीत चालढकल करत आहे आणि जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून आम्ही मागणी केली. पण ती नाकारली म्हणून आम्ही वॉक आऊट केले'