Rahul Gandhi: राहुल गांधींच्या लंडनमधील वक्तव्यावरून राजकारण तापलं; माफी मागावी अशी विरोधकांची मागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आज वादळी सुरुवात झाली आणि लंडनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे संसदेची दोन्ही सभागृहे कोणतेही ठोस कामकाज न करता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. लंडनमध्ये देशाच्या लोकशाहीवर कथित प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी आता विरोधक करत आहेत