खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस व हनुमान जयंतीचे औचित्य साधत अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आली. त्यानंतर मंचावर भाषण देताना नवनीत राणा यांनी तुरुंगात काढलेल्या त्या दिवसांची आठवण सांगितली. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं चॅलेंज नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. या संपूर्ण प्रकरणात राणा दाम्पत्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. हे सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.