Ravi Rana on Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरेंसोबत फक्त आदित्य,अनिल परब आणि राऊत राहतील'; राणांचा टोला
'निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता येणाऱ्या पंधरा दिवसात शिवसेना भवनसुद्धा शिंदे यांच्या ताब्यात येईल व मुख्यमंत्री शिंदे त्या ठिकाणी बसतील' अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. 'बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. ९० टक्के पेक्षा जास्त सच्चे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे लोक हे मुख्यमंत्र्यांसोबत आहे.त्यामुळे त्यांचं बहुमत सिद्ध होतं आहे. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त अनिल परब, संजय राऊत,आणि आदित्य ठाकरे हे तिघेच राहतील' असा टोलाही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आमदार रवी राणा यांनी लगावला #ravirana #uddhavthackeray #eknathshinde #shivsena