शैक्षणिक शुल्कासाठी काही महाविद्यालये विद्यार्थिनींची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. याच मुद्द्यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयांना एक इशारा दिलाय. महाविद्यालयांना शासनाच्या हमीने बँका कर्ज देतील. त्यानंतर शैक्षणिक शुल्काची रक्कमही शासनाकडून मिळेल. पण असं असताना जर शैक्षणिक शुल्कासाठी महाविद्यालये विद्यार्थिनींची अडवणूक करत असतील तर मात्र त्यांची संलग्नता रद्द करू, असं ते म्हणाले.