गगनबावडा तालुक्यातील सर्वात मोठा २.७१ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असणारा हा कुंभी प्रकल्प असून अतिवृष्टीच्या काळात विद्युत गृहातून सोडलेला विसर्ग वगळता यावर्षी पाटबंधारे विभागाने केलेल्या सुनियोजनामुळे पाणी पातळी वाढण्याचा धोका कमी झाला. परिणामी महापुराच्या काळात पिके पाण्याखाली राहण्याचा कालावधी घटल्याने शेतकरी वर्गाला याचा फायदा झाला आहे.