आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा खाली आहे, संधीसाधूंसाठी नाही. आमच्या पक्षाची दारे सगळ्यासाठी उघडी आहेत. सत्तेसाठी नव्हे, तर पक्षासाठी ज्याला काम करायचे आहे, अशा लोकांसाठी आमची दारे उघडी आहेत. आगामी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. काँग्रेस हाच सत्तेतला प्रमुख पक्ष राहणार आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज इंदापुरात बोलताना केला. ते पंढरपूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपूरला निघाले होते. त्यावेळी इंदापुरात थांबल्यानंतर त्यांनी हा दावा केला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics