लहान मुलांना आपल्या खाद्यपादार्थांकडे आकर्षित करण्यासाठी विक्रेता कंपन्या कुठल्याही थराला जातात. आजकाल टी. व्ही., रेडीओ ह्यांसारख्या जलद माध्यमांमुळे कुठल्याही पदार्थाची जाहिरात करणे आणि ती त्वरित लोकांपर्यंत पोहचवणे अगदी सोपे झाले आहे. परंतु ह्याच खाद्यापदार्थामुळे एक दुःखद घटना आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या अमरावती शहरात घडली. आजकालच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेट्स मध्ये लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी एखादे खेळणे ठेवले जाते. ह्या खेळण्यांमुळेम मुले हट्ट करतात आणि आई वडील सुद्धा त्यांचा हा हट्ट लगेच पुरवतात. परंतु अमरावतीच्या एलरू भागातल्या 4 वर्षांच्या मिसला निरीक्षण ह्या लहानग्याने बुधवारी संध्याकाळी टोमॅटो चिप्स खाता खाता त्यातले खेळणे सुद्धा गिळले. मुलाच्या पालकांनी चिप्स उत्पादक कंपनी वर केस दाखल केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews