विधानसभेत लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात 22 कैद्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.2014 ते 16 दरम्यान 32 कैद्यांचा मृत्यू झालाय. यापैकी 10 कैद्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती. पण २२ कैद्यांच्या मॄत्युचा अहवाल अजूनही नाही. त्यामुळे एकंदरीत कारागृहातील सुरक्षेवर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याआधी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात मंजुळा शेट्ये या महिलेचाही मृत्य़ू झाला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता नागपूरच्या कारागृहातील संशयास्पद मृत्यूंची ही आकडेवारी धक्कादायक आहे. या माहितीने पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews