आपल्या विधानांमुळे नेहमी वादात राहणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. येत्या काळात या विधानावर बरीच चर्चा होणार आहे. ‘राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात , राहुल सध्या मंदिरांमध्ये फिरत आहेत, तर त्यांच्या पक्षाचे कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा विरोध करत आहेत. जर 2019 पर्यंत राम मदिर बनलं नाही तर देशातील लोकांवर अन्याय होईल’ असे ते म्हणाले. भाजपा नेता जीवीएल नरसिंह राव यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना अल्लाउद्दीन खिलजीचा नातेवाईक असल्याचे ट्विट केले होते. त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत साक्षी महाराज यांनी राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात असे वक्तव्य केले आहे. बाबरी मस्जिदीच्या पाडावावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राम मंदिराबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे असा प्रश्न शाह यांनी पत्रकार परिषदेत केला होता
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews