स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं झाली,तरी अगदी परवा परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती.पण आता इतक्या वर्षांनी तिथे प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव. सातपुड्याच्या कुशीत वसलेलं हे अंबापानी पाडा गाव. आजूबाजूला संपूर्ण जंगल.जमिनीला टेकून उभारलेल्या झोपड्यां ची घरं, त्यामुळे संध्याकाळ झाली की घराबाहेर पडण्याची सोय नाही. अंधारात कधी जंगली श्वापद येऊन हल्ला करेल, याचा नेम नाही.हे चित्र पालटायचं ठरवलं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी.त्यांच्या पुढाकारातून गावात सौरऊर्जेवरचे दिवे बसवण्यात आले. अंबापानी, चारमाळी, रुईखेडा ही गावं प्रकाशानं उजळली. इतकी वर्ष महिलांनी पणती आणि मेणबत्तीच्या उजेडातच स्वयंपाक केला... पण आता दिवा लागल्यानं अख्खं घर उजळलं... रोज रात्री आठ ते दहा या वेळात इथल्या आदिवासींना वीज वापरायला मिळणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews