हिंदूंचे श्रद्धास्थान आणि आस्था असलेले अमरनाथ मंदिराच्या गाभ्यात मंत्र पठण आणि घंटा नाद करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. यात्रेकरूंना पुरेश्या पायाभूत सुविधा उपलब्ध न केल्यामुळे मंदिर मंडळाला लवादाने यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लवादाने अजूनही काही आदेश जारी केले आहेत. त्या नुसार मंदिराची समुद्र सपाटी पासूनची उंची 3888 मीटर आहे. या मंदिरात येतांना यात्रेकरूंनी आपले मोबाईल्स , मौल्यवान वस्तू शेवटच्या चेक पोस्ट नाक्यावर जमा कराव्यात आणि त्याच बरोबर मंदिर मंडळाने सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावेत असे आदेश दिले आहेत. शिवाय मंदिराच्या गुहेपर्यंत जाण्यासाठी भक्तांना रांगेत जाण्यासही अनिवार्य करण्यात आले आहे. ह्या मंदिरात दर वर्षी जवळ पास 10 लाख भक्त येत असतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews