रोजच्या जेवणात पालेभाज्यांच्या समावेश असावा, असे अन्नशास्त्रमध्ये कायम सांगितले जाते. मात्र बदलती जीवनशैली आणि जेवणाच्या सवयींमुळे ताटातल्या पालेभाज्यांची जागा कमी कमी होते आहे ‘रोजच्या जेवणात हिरव्या भाज्यांच्या समावेश करणे मेंदू तजेलदार ठेवण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. वयाबरोबर स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांमध्ये वागाने वाढते आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे रुश विद्यापीठातील शास्त्रज्ञ मोर्था क्लेर मोरिस यांनी सांगितले.प्रत्येक पालेभाजीचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत. मात्र पालक, लेट्यूस आणि कोबीमधील जीनवसत्वे प्रत्येक वयोगटासाठी आवश्यक आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews