नायब राज्यपाल बैजल हे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अक्षरशः चपराशाची वागणूक देत आहेत, असा जोरदार हल्ला समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी चढवला. राज्यसभेत आम आदमी पार्टीचा एकही खासदार नाही, पण विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भक्कम पाठिंबा दिला. त्यात काँग्रेस, माकपा, भाकपा, तृणमूल काँग्रेस यांचा समावेश आहे.दिल्लीच्या सरकारला जादा अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी नरेश अग्रवाल यांनी केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हा अवमान आहे, असे त्यांनी सांगितले. ही समस्या एकटय़ा दिल्लीतच नाही तर पुड्डेचरीतसुद्धा हेच चालले आहे, असे त्यांनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews