ठाण्याच्या सिव्हिल रूग्णालयातून काल चोरीला गेलेलं बाळ सापडलंय. यानिमित्तानं बाळं पळवणा-या एका टोळीचा पर्दाफाश झालाय. गुडिया सोनू राजभर, सोनू परशूराम राजभर आणि विजय श्रीवास्तव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सापडलेलं बाळ सुखरुप आहे. या टोळीनं एकूण सहा मुलं आतापर्यंत पळवली होती. या तीन जणांच्या टोळीत दोन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. या तिघांनाही कल्याणजवळच्या पिसवली गावातून अटक केलीय. भिवंडीमधील मोहिनी भोवर या महिलेचं ६ तासांचं बाळ चोरीला गेलं होतं. सिव्हील रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वारातून महिला बाळ घेऊन जात असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय. सिव्हील रुगणालयात सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचेच या घटनेतून पुन्हा समोर आलंय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews