बुलडाणा पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजींनी बुलडाण्यात अनोखं आंदोलन केलं. बोरी गावातील एका विहिरीच्या तळाशी बसून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.या प्रकरणात चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी केली. कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात विविध योजनेत विहिरींच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी केलेली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews