Lokmat Sport News | म्हणून ओळखला जाणारा Dhoni Hardik Pandya वर प्रचंड भडकला ! पण का | Cricket |News

Lokmat 2021-09-13

Views 0

शांत आणि संयमी अशी धोनीची खरी ओळख पण काल एका क्षणी धोनी आपला संयम गमावून बसला आणि ते कॅमेऱ्यात कैदही झालं. भारतीय संघाने १९.१ षटकामध्ये १७१ धावा केल्या होत्या. त्यावेळी धोनी आणि मनिष पांडे खेळत होता.दोन्ही फलंदाज तुफान फटकेबाजी करत होते. १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनिष पांडेन फटकावलेल्या चेंडूवर धोनीनं दोन धावांचा कॉल दिला. मात्र, मनिष पांडेनं त्याकडे लक्ष न देता आरामात एकेरी धाव घेतली. यामुळेच धोनी त्याच्यावर प्रचंड भडकला.कायम शांत आणि संयमी असणाऱ्याने धोनीने यावरुन भर मैदानाताच पांडेला सुनावलं. 'उधर क्या देख रहा है, इधर देख ले.' अशा शब्दातच धोनीनं त्याला दरडावलं. धोनीचा हा आक्रमकपणा पाहून पांडेही काही काळ भांबावून गेला होता. पण आपली चूक झाल्याचंही त्यावेळी त्याच्या लक्षात आलं.बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना जुना धोनी पाहायला मिळाला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS