धुळे आगारातून आता थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यत शिवशाही बस सेवा प्रथमच सुरू करण्यात आलीय.ही बस धुळ्यातून पहाटे चार वाजेच्या सुमारास निघेल आणि सकाळी अकरा ते बारा वाजेदरम्यान मंत्रालयाला पोहचणार आहे.एका दिवसात धुळे ते मुंबई आणि मुंबईहून काम पूर्ण करून धुळ्यात परतणे या शिवशाही बस सेवेमुळे शक्य होणार आहे. ही बस वाताकुलीत राहणार आहे. एका बाजुचं तिकीट पाचशे पच्चावन्न रूपये असणार आहे. एक महिना आधी या बसचं बुकिंगही करता येणार आहे. धुळे करांना या शिवशाही बसमुळे रात्री ट्रॅव्हल्सने निघण्याची गरज राहणार नाही. पहाटे या बसने निघाले तरी कामानिमित्त वेळवर मंत्रालयात पोहचणे शक्य होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews