शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होताना दिसत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनीदेखील उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावर टीका केली आहे. राहुल गांधींच्या भाषणाप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं भाषणही हास्यास्पद होतं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.