मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. विक्रोळीतील छत्रपती संभाजी महाराज मैदानाचे २० नोव्हेंबर २०२१ रोजी लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना राऊतांनी विरोधी पक्षाला टोला लागण्याची संधी सोडली नाही.