उस्मानाबाद शहराचं धाराशीव असं नामकरण करण्यास केंद्र सरकारनं ‘ना हरकत पत्र’ दिलं आहे. मात्र, औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजी महाराज असं नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. नामांतराचा प्रस्ताव रखडवून ठेवण्याचं कारण काय? भाजपा नेते नेमकं कोणाला घाबरताहेत, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.