पुणे महानगरपालिकेकडून ११ डिसेंबर हा दिवस 'पुणे पादचारी दिन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. शनिवारी पुण्यात पहिला पादचारी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुण्यातील लक्ष्मी रोडवर 'ओपन स्ट्रिट मॉल' ही संकल्पना राबविण्यात आली होती. पुण्यात खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी रोडचं रूपांतर स्ट्रिट मॉलमध्ये झालेलं पाहायला मिळालं. या उपक्रमामुळे सतत माणसांची वर्दळ आणि वाहतुकीने गजबजलेला लक्ष्मी रोड मोकळा पाहायला मिळाला.