कोल्हापूर(Kolhapur) - आम्ही जरी अपंग असलो तरीही नोकरीसाठी दारोदारी फिरलो .पण अपंग आहे म्हणून अनेकांनी नोकरी नाकारली. तब्बल 12 गोल्ड मेडल मिळालेली अपंग शोभा व उमेश पाटील सांगत असतात आणि त्यांची संघर्षाची कहानी उलगडत असते. अजूनही ते नोकरीच्या अधिकारापासून वंचितच आहेत. सोनतळी (ता. करवीर) येथील हे दांपत्य आहे.
सोनतळी येथे शाहूकालीन घोड्याच्या पागा आहेत. पूर्वी उमेश पाटील यांचे चुलते याठिकाणी कामाला होते आणि त्यामुळे त्यांना तिथे राहण्याची मुभा होती. उमेशचे वडील व त्यांचे चुलते पुर्वी एकत्र राहत होते .परंतु त्यानंतर त्यांना इतरत्र भाड्याच्या खोलीत रहावे लागले. उमेश पाटील यांना पोलिओमुळे एका पायाला अपंगत्व आले. त्यामुळे उमेशच्या वडिलांना धक्का बसला. त्यांचं कसबसं शिक्षण झालं आणि शिक्षण घेता घेता पुण्यात नोकरीही मिळाली. परंतु ती फार काळ टिकली नाही.
(व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#kolhapur #kolhapurnews #umeshpatil #shobhapatil #inspirationalstory