नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यावरुन मोठा निर्णय घेतला आहे. अजान सुरू असताना मशिदीपासून शंभर मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.