कधी राजकीय विधानं तर कधी विरोधकांसोबत ट्विटर वॉर... राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सतत चर्चेत असतात. रूपाली चाकणकर यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तेव्हा या याविषयावर राजकीय चर्चा रंगल्या होत्या. या आणि अश्या अनेक विषयांवर रुपाली चाकणकर यांच्याशी आम्ही मुक्त संवाद साधला.