संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीनं सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडं रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणं आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणं उकरुन काढत त्रास दिला जातोय. यात भाजपचे चारित्र्य उघडं होतंय."
#Shivsena #bjp #uddhavthackeray #PMModi #MVA #AjitPawar #SanjayRaut #DevendraFadnavis #ED #CBI