आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत एका महिला शिवसैनिकाने बंडखोर नेत्यांवर जोरदार टीका करत त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. तसेच "गेले ते कावळे आणि राहिले तेच खरे मावळे" असं म्हणत नेत्यांना सुनावलं. आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचंही या महिलेनं म्हटलं.