'बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, पण आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे. युती तोडून काँग्रेसची विचारधारा स्वीकारून भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसुन युती तोडली. त्यामुळे युती तोडण्याला जवाबदार हे फक्त उध्दव ठाकरेंचा स्वार्थ आणि पुत्रप्रेम आहे' अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली.